मोठी बातमी! दोन स्थानकांमध्ये भुयारात मुंबई मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Big News ! दोन स्थानकांमध्ये भुयारात मुंबई मेट्रो बंद, Metro Line 3 faces first technical glitch
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा सुरू होऊन एक महिना झाला नाही तोच Big News ! दोन स्थानकांमध्ये भुयारात मुंबई मेट्रो बंद, Metro Line 3 faces first technical glitch मेट्रो गाडी भुयारातच बंद पाडल्याची घटना घडली आहे. बीकेसीच्या दिशेने जाणारी मेट्रो रात्री पावणेआठच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे दोन मेट्रो स्थानकांच्या मध्ये भुयारातच बंद पडली. मेट्रो अचानकच भुयारात बंद पडल्याने प्रवासी गाडीत अडकले, प्रवाशांना काही समजेना आणि एकच गोंधळ सुरू झाला. शेवटी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गाडी ज्या ठिकाणी बंद झाली होती त्या ठिकाणी धाव घेत गाडीतील तांत्रिक बिघाड दूर केला आणि त्यानंतर मेट्रो गाडी नजीकच्या टी १ मेट्रो स्थानकावर घेऊन आणण्यात यश आले. त्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यादरम्यान आरे ते बीकेसी मेट्रो सेवा २० मिनिटे विस्कळीत झाली होती.
शनिवारी आरे मेट्रो स्थानकातून सुटलेली आणि बीकेसीला जाणारी मेट्रो गाडी सहार आणि टी १ मेट्रो स्थानकाच्या मध्ये भुयारात बंद पडली. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडली. गाडीत लहान मुले आणि वयोवृद्ध असल्याने अनेक प्रवासी काहीसे घाबरले होते. काहींनी गाडीतील मेट्रो पायलटशी संपर्क साधत लवकरात लवकर सुटका करण्याची विनवणी केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमएमआरसीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ पोहचले. त्यानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले.
मेट्रो मधील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी २० मिनिटे एवढा वेळ लागला आणि गाडी सुरू झाल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे. गाडी सुरू झाल्यानंतर ही गाडी टी-१ टर्मिनल स्थानकावर नेण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व मेट्रो गाडी कारशेडमध्ये तांत्रिक दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली. यादरम्यान २० मिनिटे आरे ते बीकेसी दरम्यानची भुयारी मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी superfastmaharashtra.com या पेजला लाईक व मित्र परिवारांसोबत शेअर करा..

0 टिप्पणियाँ